
महामंत्री कॉम वेणू पी नायर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०४.०८.२०२६ रोजी रतनागिरी, कोंकण रेल्वे येथे सामूहिक रजा अंदोलना संभदीतं भर पावसात सभा पार पडली.
चिपळूण येथे कर्मचाऱ्यांच्या बुलंद घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले, तर रत्नागिरी येथे मुसळधार पावसाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला आपला ठाम आणि संपूर्ण पाठिंबा दर्शविला. पावसात भिजतही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या दमदार घोषणांनी संघर्षाची ताकद आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली.
या प्रसंगी महामंत्री कॉ. वेणू पी. नायर यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कामांमध्ये चालढकल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना आपली भूमिका तत्काळ सुधारण्याचा स्पष्ट संदेश दिला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्या **लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १० ऑगस्ट २०२६ रोजीचे सामूहिक रजा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा ठाम इशारा प्रशासनाला देण्यात आला.
संघर्ष तीव्र करूया!
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देऊया!














