
चिपळूण येथे १० ऑगस्टच्या सामूहिक रजा आंदोलनाची जोरदार तयारी!
दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी चिपळूण स्टेशन येथे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने आगामी १० ऑगस्ट २०२६ रोजी कोकण रेल्वेवर आयोजित सामूहिक रजा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगार मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले.
कॉ. कुमार घोसाळकर, असिस्टंट जनरल सेक्रेटरी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नॅशनल रेल्वे मजदूर युनियन भविष्यातही वेळोवेळी संघटित आंदोलने उभारून कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ठामपणे लढत राहील.
कामगार एकजुटीचा विजय असो!
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जिंदाबाद!














