
नेशनल रेल्वे मजदूर युनियन (मध्य/कोकण) चे ज्येष्ठ कार्यकर्ते, कुर्ला डिझेल शाखेचे चेअरमन, ईसीसीसी सोसायटीचे डेलिगेट आणि कामगार चळवळीचे खंदे समर्थक कॉ. काळुराम साळुंखे यांचे वयाच्या 58 व्या वर्षी, दीर्घ आजाराने दिनांक 08 जुलै 2026 रोजी वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले.

दिनांक 09 जुलै 2026 रोजी वांगणी येथील वैकुंठधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच रेल्वे कामगारांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कॉ. काळुराम साळुंखे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कामगार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांचा शांत, मनमिळाऊ आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा स्वभाव प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या निधनामुळे रेल्वे कामगार चळवळीची, विशेषतः कुर्ला डिझेल शाखेची, मोठी आणि कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

नेशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने झोनल सचिव कॉ. पी. जे. शिंदे यांनी, जनरल सेक्रेटरी कॉ. वेणू पी. नायर यांच्या उपस्थितीत, कॉ. काळुराम साळुंखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कॉ. गोव्हर्धन राठोड, कॉ. भीमराव कांबळे, कुर्ला शाखेचे पदाधिकारी तसेच नेशनल रेल्वे मजदूर युनियनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.