
दिनांक १ मे २०२६ रोजी एन आर एम यूच्या वतीने कल्याण इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन व बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कल्याण मेन ऑफिसपासून भव्य रॅली काढून महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरणीय महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कल्याण इन्स्टिट्यूट येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात कॉ. पी. जी. शिंदे, कॉ. आर. के. मलबारी, कॉ. पटेरिया व कॉ. संदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले. आदरणीय महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांनी कामगार चळवळ, चार लेबर कोड व संघर्षाची गरज यावर प्रभावी भाषण केले.
”शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश कार्यक्रमातून दृढ करण्यात आला.














