HomeMemorandumआज दिनांक 07.10.2026 रोजी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) मध्ये इतर कामगार संघटनांमधून आलेल्या अनेक कर्मचारी कार्यकर्त्यांनी कामगार हिताचा विचार, संघर्षाची परंपरा आणि NRMUच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत उत्साहपूर्ण प्रवेश केला.
आज दिनांक 07.10.2026 रोजी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) मध्ये इतर कामगार संघटनांमधून आलेल्या अनेक कर्मचारी कार्यकर्त्यांनी कामगार हिताचा विचार, संघर्षाची परंपरा आणि NRMUच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत उत्साहपूर्ण प्रवेश केला.
कामगार एकतेला नवी ताकद! | NRMU मध्ये उत्साहपूर्ण प्रवेश
आजचा दिवस NRMU परिवारासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा!
आज नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) मध्ये इतर कामगार संघटनांमधून आलेल्या अनेक कर्मचारी कार्यकर्त्यांनी कामगार हिताचा विचार, संघर्षाची परंपरा आणि NRMUच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत उत्साहपूर्ण प्रवेश केला.
या प्रवेश कार्यक्रमास NRMU चे आदरणीय महामंत्री कॉम. वेणु पी. नायर जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कैलास कळगुडे, तेजस्वी कळगुडे, विश्वनाथ चौधरी, कुणाल निर्भुवने, सचिन जगताप यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी NRMU परिवारात प्रवेश करून कामगारांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठीच्या संघर्षाला आपली साथ दिली.
NRMU परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन!
ही केवळ संघटनेत होणारी भरती नाही, तर कामगार एकतेवर आणि संघर्षाच्या सामर्थ्यावर व्यक्त झालेला विश्वास आहे.