
संघर्षशील नेतृत्वाचा सन्मान… कामगार एकजुटीचा हुंकार!
आज कणकवली रेल्वे स्थानकावर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांचे कोकणकन्या एक्सप्रेसने आगमन होताच शाखा कणकवलीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी महामंत्र्यांनी शाखा सचिव कॉम्रेड प्रशांत तांबे यांच्या नूतन वास्तूचे उद्घाटन केले. तसेच उपस्थित पदाधिकारी व सहकाऱ्यांशी आत्मीय संवाद साधत संघटनात्मक एकजूट आणि कामगारांच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ केली.
हा सोहळा केवळ सत्काराचा नव्हे, तर NRMU च्या संघर्षमय वाटचालीवरील विश्वास, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि कामगार एकजुटीचे प्रतीक ठरला!














